नाशिक : व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षांचे तोंड कापावे लागलेय त्याच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल?, वो तो बस अपने ‘मालिक’ का धर्म निभा रहा है, असं म्हणत भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी शरद पवारांवर टीका केली होती. ही टीका त्यांना चांगलीच भोवली आहे. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल करण्यात आले असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अटकेची मागणी केली आहे.
रविवारी तुषार भोसलेंविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नाशिक तालुका, येवला, देवळा, चांदवड, मालेगाव ग्रामीण, आडगाव या सात पोलीस ठाण्यांत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काल शिष्टमंडळांसह तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात हे प्रकरण चांगलेच तापले आहे.
क्रुझ पार्टीवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अट केली होती. क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासह इतर अनेक जणांना २ ऑक्टोबर अटक करण्यात आले. त्यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली होती.
या पार्श्वभूमीवर भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. यावरुन राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष महेश हांडे यांनी तुषार भोसलेंवर गुन्हा दाखल झाला होता. शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आचार्य तुषार भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सायबर पोलिसांनी भोसले यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लोकांना तुरूंगात ठेवून पब्लिसिटी करून घेणं हा वानखेडेचा उद्योग’- नवाब मलिक
- ‘…नंतर ‘तेच’ माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते’, भुजबळांनी सांगितला जेलवारीचा अनुभव
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा – शंभूराज देसाई
- वळसे पाटील कोरोनावर मात करून लवकरच सेवेत रुजू व्हाल, याची खात्री- अजित पवार
- आर्यन खानच्या मदतीला जुही चावला आली धावून म्हणाली…


