Share

‘परमबीर सिंह बेल्जियममध्ये कसे गेले?’ संजय निरुपमांचा सवाल

Published On: 

मुंबई : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह गेल्या काही दिवसांपासून फरार आहेत. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हेही दाखल आहेत. पोलिसांनी त्यांना शोधण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र ते हाती लागले नाहीत. आता ते बेल्जियममध्ये असल्याची माहिती काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत दिली आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

परमबीर सिंह यांच्यावर आतापर्यंत विविध कलमान्वये चार एफआयआर दाखल झाले आहेत. यातील तीन गुन्हे वसूलीचे तर एक गुन्हा अॅट्रोसिटीचा आहे. परमबीर सिंहांना मदत केल्याचे अढळलेल्या २५ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई होणार आहे, तसा प्रस्ताव पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृह विभागाला पाठवला आहे.

काँग्रेस नेते संजय निरुपम ट्विटकरत म्हणाले, ‘हे आहेत मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त. यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर हप्तावसुलीचा आरोप केला होता. परमबीर सिंह पाच प्रकरणांमध्ये वाँटेड आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की ते फरार आहेत. आता हे समजलं आहे की ते बेल्जियममध्ये आहेत. परमबीर सिंग बेल्जियममध्ये कसे गेले? त्यांना बेल्जियममध्ये सेफली कुणी पाठवलं? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना देशात आणू शकत नाही का? असे सवाल निरुपम यांनी उपस्थित केले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!