Share

टीम इंडियाला भटकंती पडली महागात ; इंग्लंडविरुद्धची मालिका धोक्यात?

Published On: 

इंग्लंड : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमवल्यानंतर काही काळासाठी भारतीय संघ सुट्टीवर गेला होता. यानंतर आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ विलगीकरणात पोहोचणार होता, मात्र यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र भारतीय संघाच्या आणखी एका खेळाडुला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भारतीय संघातील एकुण २ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. एका खाजगी वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले. दुसऱ्या खेळाडूची चाचणी सकारात्मक आली आहे. मात्र या खेळाडूत कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही खेळाडू विलगीकरणात उपचार घेत आहे.

दरम्यान, भारतीय टीम मधील खेळाडू सुट्टीच्या काळात इंग्लंच्या रस्त्यावर भटकंती करताना दिसले होते. टीम इंडियाची सुट्टी सुरु झाली तेव्हा ब्रिटनमध्ये करोनाचा धोकाही अधिक वाढला होता. तरीही खेळाडूंची आपल्या परिवारासह लंडन आणि जवळपासच्या परिसरात भटकंती सुरू होती.

रोहित शर्मा,अजिंक्य रहाणे, केएल राहुल, इशांत शर्मा, अनुष्का-कोहली हे खेळाडू लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसले होते. जसप्रीत बुमराह त्याची पत्नी संजना गणेशनसोबत युरो कप सेमी फायनल बघण्यासाठी गेला होता. तर कोच रवी शास्त्री यांनी विम्बलडन सामन्यांचा आनंद घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!