Share

निवडणूकीच्या वर्षभरानंतरही खर्चाचा तपशील गायब; सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गतवर्षी जानेवारी महिन्यात निवडणुका लागल्या होत्या. ग्रामपंचायतीच्या या निवडणुकांमध्ये खर्चाचा तपशील सादर करण्याचे आदेश सदस्यांना देण्यात आले होते. मात्र हा तपशील सादर न करणाऱ्या ८६ सदस्यांवर जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र का करू नये अशी विचारणा करणारी नोटीस बजावली आहे. खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.

कनकशिळ, इंदापूर ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप कामठे, अनिल वाघ, शोभा बोडके, काशीबाई निकम, राम पोपळे, काशीबाई म्हस्के सविता राणे, विमल कामठे, सोमीनाथ भालेराव, कांचन निकम, प्रदीप निकम बिनविरोध निवडून आले होते. संदीप निकम निवडणुकीत विजयी झाले होते. ग्रामपंचायत सदस्य निवडणूक अधिकार्‍यांकडे निवडणूक खर्चाचा तपशील सादर केल्याचा दावा केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी तीस दिवसात निवडणूक खर्चाचा तपशील माझ्या कडे सादर केला होता असा खुलासा निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग लहाने यांनी केला आहे.

तर तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी विलंबाबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. निवडणूक खर्चाचा तपशील दाखल न करणारा उमेदवार निवडून आलेल्या व ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले जाण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!