Share

Exclusive News! मनोहरे स्वीकारणार पदभार, पांडेय विरुद्ध मनोहरे सामना सोमवारी रंगणार

Published On: 

औरंगाबाद : नगर विकास विभागाने १ फेब्रुवारी रोजी स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली. त्यानुसार नगरविकास मंत्रालयाकडून मिळालेल्या तातडीच्या सूचनांनुसार ते गुरुवारी (दि.१८) औरंगाबादेत दाखल झाले. सोमवारी (दि.२२) स्मार्ट सिटी सीईओ पदाचा कार्यभार स्विकारणार असल्याची माहिती मनोहरे यांनी ‘ महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिली. तसेच स्थगितीबद्दल आपल्याला काहीही माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता प्रशासक पांडेय विरुद्ध मनोहरे हा वाद शमतो की विकोपाला जातो हे येत्या सोमवारीच स्पष्ट होईल.

महापालिकेचे आयुक्तच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे काम पाहत असताना राज्य शासनाने १ फेब्रुवारी रोजी स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर मुख्याधिकारी संवर्गातील बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली. आत्तापर्यंतच्या प्रत्येक आयुक्तांनी स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेच्या कामांना झुकते माप दिले. महापालिकेच्या आर्थिक अडचणीमुळे जी कामे होऊ शकली नाहीत. ती कामे स्मार्ट सिटी योजनेत घेण्यात आली. महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मनोहरे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. त्यांनी सदर नियुक्ती रद्द करण्याची मागणी नगरविकास खात्याकडे केली होती. मात्र, गुरुवारी (दि.१८) आठ दिवसानंतर मनोहरे औरंगाबाद शहरात दाखल झाले. त्यांनी शासन आदेशानुसार आपण स्मार्ट सिटीच्या सीईओपदी रुजू होत असल्याचे पत्र महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठवून दिले.

सोमवारी घेणार स्मार्ट कामांचा आढावा
गुरुवारी (दि.१८) महापालिकेत दाखल होण्यास आपणास उशीर झाला. त्यानंतर आलेल्या सुट्यांच्या पार्श्वभूमीवर आता सोमवारी स्मार्ट सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारणार आहोत, अशी माहिती बाबासाहेब मनोहरे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!