Share

खळबळजनक! सेंटरमधील पॉझिटिव्ह रुग्णाचा हॉटेलमध्ये नाश्ता? मनपाकडून इन्कार

Published On: 

औरंगाबाद : शहरातील एका कोविड सेंटरमधून पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर येऊन हॉटेलवर नाश्ता करतो आणि पुन्हा सेंटरवर परतल्याची घटना शहरातील एका कोविड सेंटरमध्ये घडल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र याबाबत मनपा अधिकाऱ्यांनी अशी घटना घडलीच नसल्याचा दावा केला आहे.

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असतांना शहरातील कोविड सेंटरमधील निरनिराळे प्रकार समोर येत आहेत. पदमपुऱ्यातील धक्कादायक घटना ताजी असतांनाच निष्काळजीपणाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमधील पॉझिटीव्ह रुग्णाने कोविड सेंटरमधून बाहेर येत हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता केल्याची कुजबुज सर्वत्र सुरु आहे.

मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर मधला हा प्रकार आहे. येथील एक पॉझिटीव्ह रुग्ण सेंटर मधून बाहेर जाऊन मित्रांना भेटून नाश्ता करून आल्याचा प्रकार गुरुवारी (दि.४ ) दुपारी १२ वाजता घडला. तो रुग्ण बाहेर जातांना त्यावेळी गेटवर सुरक्षा रक्षक नव्हता. बाहेर जाऊन परत येत असतांना सुरक्षा रक्षकाने त्यांना थांबवले. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. या प्रकारावरून सेंटरच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अनेक वेळा रुग्णांचे नातेवाईक रुग्णाला भेटण्याचा धडपड करत असतात. त्यांना थेट वार्डापर्यंत डब्बा नेऊन देण्याचे प्रकार सुद्धा अनेक वेळा घडले आहेत. तसेच रुग्ण सुद्धा बाहेर पर्यंत जातात या प्रकारामुळे लोकांना, रुग्णांना तसेच त्यांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांना कोरोनाच्या संसर्गाची भीती किंवा गांभीर्य नाही का, असा सवाल इथे उपस्थित होतो.

मनपाच्या आरोग्य विभागाने सांगितले ‘काळजी घेऊ’

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना या प्रकाराबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, अशी कुठलीही घटना या सेंटरमध्ये झालेली नाही. याबाबत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. कुठल्याही सेंटरवर जर असे प्रकार होत असतील तर तातडीने उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये होणारे हे प्रकार लज्जास्पद आहेत. एकीकडे डॉक्टर बेजबाबदारपणे वागतांना दिसून येत आहेत तर दुसरीकडे रुग्ण निष्काळजीपणे वागत असल्याचे दिसते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!