Share

हद्दच झाली! आईचे नाव बदलण्यासाठी मुख्याध्यापकाने मागितली लाच

Published On: 

औरंगाबाद : मुलाच्या शाळेतील प्रमाणपत्रावर आईचे नाव बदलण्यासाठी साडेतीन हजारांची लाच घेणाऱ्या एका मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी सापळा लावून रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी तालुक्यातील अन्वी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत करण्यात आली.

सिल्लोड तालुक्यातील अन्वी येथील जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापक संजय मुरलीधर वाघमारे असे लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. पंचेचाळीस वर्षीय तक्रारदार महिलेचा मुलगा अन्वी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. मुलाच्या प्रमाणपत्रावरील आईचे नाव बदलण्याची महिलेने मुख्याध्यापकांना विनंती केली. यासाठी महिलेला मुख्याध्यापकाने चार हजाराची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार महिलेने एसीबीकडे तक्रार केली.

गुरुवारी एसीबीच्या पोलीस निरीक्षक रेशमा सौदागर यांनी सापळा लावला व मुख्याध्यापकाला साडेतीन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई एसीबीचे पोलिस नाईक रवींद्र आंबेकर, अरुण उगले, भुषण देसाई, चांगदेव बागुल यांनी केली. या प्रकरणी आरोपीविरुध्द ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एरव्ही अनेक शासकीय कार्यालयात चिरीमिरीसाठी सर्वसामान्यांची कामांमध्ये अडथळे आणले जातात. परंतु शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात ही लाचेची मागणी केली जात असल्याचे हे प्रकरण समोर आले. या मुख्याध्यापकाला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!