Share

Raghuram Rajan | “मोदी सरकारला तेच बरोबर वाटतात जे त्यांचं कौतुक करतात”; रघुराम राजन यांची टीका

Published On: 

दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत मजबूत आहे, परंतु रोजगाराच्या संधी नसल्यामुळे पुढील दहा वर्षांत समस्या अधिक वाढू शकतात. महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने आर्थिक संकट येऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच ते असेही म्हणाले “आपण आता स्वस्थ बसता काम नये. आपल्याला आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे. परंतु मोदी सरकार फक्त त्यांची स्तुती करणाऱ्यांनाच योग्य मानते, बाकी सगळ्यांना चुकीचे मानले जात आहे.”

एका खासगी वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, “जागतिक अर्थव्यवस्था संकटातून जात आहे. कोविडमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आपण अजूनही गरीब देश आहोत. गेल्या काही वर्षात नोकऱ्यांची गरज वाढली आहे मात्र संधी कमी आहेत. आपल्याला लोकांचे कौशल्य वाढवण्याबरोबरच शिक्षण क्षेत्राला गती देखील द्यावी लागणार आहे. येत्या 10 वर्षात जे तरुण पदवीधर होतील, त्यांना स्किल बेस एज्युकेशन द्यावे लागेल, तरच नोकरीच्या संधी वाढतील.”

पुढे रघुराम राजन असेही म्हणाले की, “लोकशाहीत संवादाला खूप महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांत, सरकारने नोटाबंदी, तीन कृषी कायदे यांसारखे व्यापक निर्णय कोणतीही सल्लामसलत न करता घेतले आहेत. ज्यामुळे नागरिक नाराज झाले आणि त्यांनी निर्णयांना विरोध केला. लोकशाहीत तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही संवाद साधता. संवाद हा नेहमी चालूच राहिला पाहिजे. महागाई ही गेल्या काही महिन्यांतील प्रमुख समस्यांपैकी एक आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी संसदेत झालेल्या चर्चेत सरकारने जाहीर केले की हे कोविड आणि युक्रेन-रशिया युद्धासारख्या बाह्य कारणांमुळे महागाई वाढली आहे, पण खरं सांगायचं तर ते तसे नाहीये.” तसेच आरबीआयने भारतातील परकीय चलनाचा साठा वाढवून भारताला पाकिस्तान आणि श्रीलंकासारख्या शेजारी देशांच्या समस्यांपासून वाचवण्यासाठी चांगले काम केले आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

तर नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेचा प्रमुख मापदंड म्हणून विकासाचा उल्लेख केला होता. सध्याची किरकोळ चलनवाढ 7 टक्के आहे आणि यूपीए सरकारच्या काळात चार वर्षांसाठी ती 9 टक्क्यांवर गेली होती, असे त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी रघुराम राजन यांच्या काही विधानांचा उल्लेख देखील त्यांनी त्यांच्या भाषणात केला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!