मुंबई : पुण्यातील कात्रज परिसरात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार व माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केल्याचं म्हटलं जात आहे. कारण याच परिसरात काल शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा देखील होती. त्याचवेळी त्या भागातून जाणाऱ्या उदय सामंत यांच्या गाडीच्या ताफ्यावर उपस्थितांनी हल्ला केला. त्यामुळे हल्ला करणारे हे शिवसैनिकच होते, असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. या हल्ल्याचा शिंदे समर्थकांनी निषेध केला आहे. तर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी अप्रत्यक्षरित्या या हल्ल्याचं समर्थन केलं आहे.
सामंत यांच्यावरील हल्ला ही उस्फुर्त प्रतिक्रिया आहे, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. काल झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देत सुभाष देसाई यांनी माध्यमांनी संवाद साधला. त्यामुळे ते म्हणाले कि, “अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता राज्यात सर्वत्र उमटत आहेत. कारण जनतेला हे आवडलेलं नाही. गद्दारी करून जर कुणी फिरत असेल तर केवळ शिवसैनिकच नाही तर सर्वसामान्य माणूसही संतप्त होणारच. या सर्व उस्फुर्त प्रतिक्रिया आहेत. पण तरीही कुणी कायदा हातात घेऊ नये. काही चुकीचं वागू नये, असा माझा सल्ला आहे. परंतु या प्रतिक्रियांमागच्या लोकांच्या भावना या तीव्र आहेत.”
देसाई यांनी केलेलं हे विधान म्हणजे हल्ल्याचं समर्थन केल्यासारखंच आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानामुळे बंडखोर पदाधिकारी अजूनच संतप्त झाले आहेत. आता त्यांच्याकडून काही संतप्त प्रतिक्रिया येण्याची दाट शक्यता आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हल्लेखोरांची चौकशी आणि तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हि घटना घडल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर पोलिसांनी तपास करून सूरज लोखंडे, संभाजी थोरवे, बबन थोरात आणि संजय मोरे यांच्यासह इतर काही आरोपीना ताब्यात घेतले आहे.
नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया
“आमच्या सभेमध्ये आदित्य साहेबांनी जे भाषण केलं, तसेच आमची जी भाषणे झाली ती संपूर्णपणे लोकशाहीच्या चौकटीतलेच विचार मांडलेले होते. उलट ज्यांना शिवसेनेची भूमिका पटत नाही त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं असं म्हटलं होते. गाडी फोडण्याच्या घटनेशी या भाषणांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांच्या तपासात जे काही समोरी येईल त्यांच्यावर योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी.” असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Sirsath : उद्धव ठाकरेंचा फोटो कार्यालयातून काढून टाकल्यानंतर संजय शिरसाठ यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…!
- Subhash Desai | “गद्दारी करून जर कुणी फिरतं असेल तर…” ; उदय सामंत हल्ला प्रकरणावर सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया
- Ajit pawar | उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यात राहणार विरोधी पक्षनेते अजित पवार
- Rohit Pawar : अनियंत्रित सत्तेला वेसण घातली जाईल का? ; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर रोहित पवारांचे सुचक ट्वीट
- Supreme Court Hearing : आज शिंदे सरकारचे भवितव्य ठरणार! सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे देशाचे लक्ष


