टीम महाराष्ट्र देशा:- राज्यात आणि केंद्रात विरोधकांकडून ईव्हीएमला जोरदार विरोध आहे. अशातच राज्यात ही अशा प्रकारचं चित्र पाहिला मिळत आहे. पण अकोल्यात ईव्हीएम बद्दल एक सकारत्मक उपक्रम राबवला गेला आहे. पाचमोरी येथील जिल्हा परिषद या शाळेत मंत्रिमंडळ निवडण्यासाठी ईव्हीएम पद्धतीचा उपयोग करण्यात आला आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे ही निवडणूक प्रक्रिया मोबाईलद्वारे घेण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया कशाप्रकारे पार पडते, यासर्व विषयी माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने ही निवडणूक घेण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६ जागांसाठी ८ उमेदवार उभे होते. प्रत्येक मतदाराला ६ जागांसाठी मत देण्याची मुभा होती. ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडली.
मतदान केलेल्या विद्यार्थ्यांच्या बोटावर शाई लावण्यात आली. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सर्वांसमोर निकाल जाहीर केला. या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना शालेय कॅबिनेट पद देण्यात आले. यात आरोग्यमंत्री, क्रीडामंत्री, शिक्षणमंत्री या पदांचा समावेश होता. शाळेच्या या अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती झाली. त्यामुळे या शाळेचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
राज्यात पुन्हा युतीचचं सरकार येणार : फडणवीस
विधानसभेला मला शिवेंद्रराजेंचे काम करावं लागेल
कॉंग्रेसमध्ये आश्वासनं पाळली जात नाहीत : पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

