नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ सध्या बदलाच्या काळातून जात आहे. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा (Rohit Sharma) ला टी-20 आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याआधी रवी शास्त्री 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियापासून वेगळे झाले होते. मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांचा पहिला कार्यकाळ 2017 मध्ये सुरू झाला त्यानंतर 2019 मध्ये त्यांची पुन्हा नियुक्ती झाली होती. आता त्यांच्या जागी राहुल द्रविडने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
शास्त्री आणि कोहली ही जोडी तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकली पण आयसीसी ट्रॉफी जिंकू शकली नाही. दरम्यान, आपल्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाची आठवण करून देत शास्त्री यांनी खळबळजनक खुलासे केले आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री म्हणाले, ‘माझ्या दुस-या कार्यकाळात मी एका मोठ्या वादात अडकलो होतो काही जण मला या जबाबदारीपासून दूर करू इच्छित होते. त्यांनी कोणालातरी निवडले आणि 9 महिन्यांनंतर, त्यांनी ज्या माणसाला बाहेर फेकले होते त्याच माणसाकडे ते परत आले. ते पुढे म्हणाले की, तेच लोक होते ज्यांना भरत अरुण कोचिंग स्टाफमध्ये नको होते.
याबद्दल शास्त्री म्हणाले, ‘होय त्यांना मी भरत अरुणला बॉलिंग कोच म्हणून द्यावं असंही वाटत नव्हतं आणि आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा परिस्थिती कशी बदलली आहे. त्यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नको असलेली व्यक्ती या भूमिकेत चमकदार कामगिरी करत आहे. मी लोकांकडे बोट दाखवत नाही. पण काही खास लोक होते, ज्यांनी मला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक न होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.’
महत्वाच्या बातम्या
- संपूर्ण देश बिपिन रावत यांच्या निधनाने शोक व्यक्त करतंय, मात्र गुणरत्न सदावर्ते विचारतात…
- भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार- पंतप्रधान मोदी
- …म्हणून आयसीसीच्या तीन स्पर्धांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला; रोहितचे मोठे वक्तव्य
- कतरिना-विकीवर शुभेच्छांचा वर्षाव; बॉलिवूड कलाकारांच्या हटके कमेंट्स चर्चेत
- ‘युपीत रामराज्य प्रस्थपित झाले, अभिनंदन योगीजी!’


