पुणे : आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणले. आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. जनतेला सारे काही समजते. शिवाय, शिवसेना म्हणजे महाराष्ट्र असा समज त्यांनी करून घेऊ नये. असा घणाघात राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, निष्क्रिय सरकारविरूद्ध मोठा रोष जनतेत आहे. शेतकर्यांना कोणतीही मदत नाही. वीजबिलांचा घोळ त्यामुळे मोठा असंतोष आहे आणि तो या निवडणुकीतून व्यक्त होईल. अस देखील फडणवीस म्हणाले आहेत. तर आमच्या एकाही आंदोलनाची दखल घेतली नाही, एकाही पत्राला उत्तर नाही, कधी कोणती बैठक घेत नाही. या सरकारला प्रश्न सोडवायचे नाही. अशावेळी जनतेचे दु:ख मांडले गेले पाहिजेत आणि तेच आम्ही आंदोलनांच्या माध्यमातून मांडतो आहोत. अशी टीका देखील फडणवीस यांनी केली.
तर, मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून केवळ वेळकाढूपणा चालू आहे. त्यामुळे केवळ मराठाच नाही, तर सार्याच समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले जात आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रारंभीपासून सरकारने लक्षच दिले नाही. असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘फक्त गाण्याचा एक कार्यक्रम ठेवा, मग कराची पण आपलीच’
- सुजय विखे व राम शिंदे यांचे अखेर मनोमिलन; स्थानिक आमदारांसाठी धोक्याची घंटा?
- बाळासाहेबांनी जो नियम पाळला तो उद्धव ठाकरेंनी मोडला – चंद्रकांत पाटील
- २६ नोव्हेंबरच्या कामगार संघटनांच्या देशव्यापी बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा- बाळासाहेब थोरात
- ‘उद्धव ठाकरेंना कॉपी करूनही उत्तर देता येणार नाही’; चंद्रकांत पाटलांची मिश्किल टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

