पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १६ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा सोहळा पुण्यात पार पडणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) या वर्धापन दिन सोहळ्यात मार्गदर्शन करतील. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन सोहळा मुंबई बाहेर पार पडणार आहे. राज ठाकरे आजच्या वर्धापन दिन सोहळ्यात मनसैनिकांना मार्गदर्शन करणार असून ते महापालिका निवडणुका जिंकण्याच्या निर्धारानं लढाव्यात, अशा सूचना मनसे कार्यकर्त्यांना देतील.
या कार्यक्रमावेळी सुरुवातीला बाळा नांदगावकर यांनी प्रस्तावना केली. यावेळी बोलताना नांदगावकर म्हणाले, लोकं मला विचारतात की तुमच्याकडे आमदार नाही, खासदार नाही, त्यांना उत्तर देताना म्हणतो की आमच्याकडे जारी आमदार खासदार नसले तरी निर्माता आमचाच आहे, असं बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले आणि एकच जल्लोष मनसैनिकांमध्ये दिसून आला.
महत्वाच्या बातम्या:
कोरियन मुली एवढा सुंदर का दिसतात? चला तर जाणून घेऊयात त्यांच्या ब्युटी टिप्स..!
उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री, कर्तृत्वाने नाही – प्रकाश आंबेडकर
‘झुंड’ पाहून अनुराग कश्यपची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला, “नागराजकडून..”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

