मुंबई : तुम्हाला माहित आहे का जगात सर्वाधिक पसंती कोणत्या ब्युटी टिप्सला दिली जाते तर कोरियन ब्युटी टिप्सना! जगातील सर्वाधिक सुंदर स्त्रियांमध्ये कोरियन स्त्रियांचा नंबर सुद्धा सर्वात वरचा लागतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा कोरियन स्त्रियांसारखे सौंदर्य हवे असेल आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करत असाल तर त्यात काही नवल नाही. तुमच्या सोयीसाठी आणि कोरियन स्त्रियांसारखे सौंदर्य मिळवण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सुद्धा अशा काही बेस्ट टिप्स घेऊन आलो ज्या नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
कोरियन सौंदर्य शास्त्राबद्दल संपूर्ण जगात फार मोठे अप्रूप आहे. त्यांचे सौंदर्य उपाय आणि उपचार जाणून घेण्याची इच्छा सर्वांचीच असते. जर तुम्हालाही कोरियन सौंदर्य शास्त्राबद्दल ओढ असेल तर आजचा हा लेख खास तुमच्यासाठीच आहे कारण आज आम्ही तुम्हाला जास्त कोणाला माहित नसलेले खास उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ काय आहेत या त्वचेला खुलवणाऱ्या आणि निरोगी ठेवणाऱ्या टिप्स!
कोरिया मध्ये फर्मेंटेड राईस स्कीन केअरचा प्रमुख भाग मानले जाते. यामुळे डॅमेज स्किन ठीक होते. स्कीन रिपेअर होते. स्कीन हेल्दी होते. शिवाय यामुळे स्कीन मधील कोलेजन उत्पादनाला सुद्धा चालना मिळते. यामुळे स्कीन वरच्या सुरकुत्या आणि अन्य समस्या सुद्धा दूर होतात. यासाठी तांदळाचे पाणी उकळून घ्या आणि मग ते गाळून घ्या. नंतर स्प्रे बॉटल मध्ये भरून हे पाणी 2-3 दिवसांसाठी फर्मेंट होण्यासाठी सोडून द्या. नंतर याचा वापर तुम्ही सकाळ संध्याकाळ फेस मिस्ट सारखा करू शकता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

