मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन केलं. त्यावरून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सोमय्यांवर जहरी टीका केली. रावणालाही वाटत असेल हा आपल्या तावडीत सापडावा, अशी जहरी टीका निलम गोऱ्हे यांनी केली आहे. यावरुन महाविकास आघाडी विरुद्ध किरीट सोमय्या रावण वॉर चांगलाच रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
निलम गोऱ्हे आज षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही खोचक टीका केली. किरीट सोमय्या आजच्या दिवशी रावण दहन करत आहेत. रावणाला ही वाटत असावे हा माझ्या तावडीत सापडायला हवा. किरीट सोमय्या हे बेरोजगार आहेत. रोजगार म्हणून रोज काहीतरी ते करत असतात, असा चिमटा निलम गोऱ्हे यांनी काढला आहे.
काहीही झालं तरी ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पुतळा जाळल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हानही सोमय्या यांनी दिली. ‘पुन्हा ठाकरे सरकारची दादागिरी. आम्ही आज सायंकाळी ५ वाजता घोटाळ्याच्या राक्षसाचा पुतळा दहन करणार आहोत. आत्ता दुपारी १ वाजता पोलीस आणि महापालिका अधिकारी माझ्या कार्यालयात येवून पुतळा ताब्यात घेत आहे. ठाकरे सरकार खासगी सोसायटीमध्ये खासगी कार्यालयात घुसून घोटाळ्याचा रावण राक्षसाचे अपहरण करीत आहे’, असं किरिट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रोहित पवारांवर प्रशासन कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार ?
- विना परवानगी मिरवणूक प्रकरणी वसमतमध्ये आमदार, खासदारांसह पाचशे शिवप्रेमींवर गुन्हा दाखल
- सणाच्या दिवशी आर्यनकडून आई-वडीलांना तुरुंगातून व्हिडीओ कॉल!
- ‘जर कोणी तिच्या पतीचा, कुटुंबाचा अपमान..’रवीनाने दिली होती ताकीद..!
- तुम्ही उन्हात, आम्ही सावलीत हे आम्हाला पटत नाही – प्रीतम मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

