Share

भीमा-कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा ISI च्या संपर्कात होते, NIA चा दावा

Published On: 

मुंबई : भीमा-कोरेगाव येथे जमावाला हिंसाचारासाठी उद्युक्त केल्याच्या आरोपाखाली सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि स्टेन स्वामी यांच्यासह आठ जणांविरूद्ध शुक्रवारी १ जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कारवाई केली. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.

एनआयएने गौतम नवलखा, हनी बाबू, आनंद तेलतुंबडे, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, मिलिंद तेलतुंबडे आणि स्टेन स्वामी या आठ आरोपींविरोधात मुंबईतील एका विशेष एनआयए कोर्टात पुरक आरोपपत्र दाखल केले.

सामाजिक कार्यकर्ता असल्याचा कांगावा करणारे गौतम नवलखा हे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होते आणि त्यांच्या खांद्यावर सरकारच्या विरोधात बुद्धिजीवींना एकजूट करण्याची जबाबदारी देण्यात आली होती असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेकने (एनआयए) केला आहे.

दरम्यान,काल भीमा-कोरेगावमध्ये २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने मोठी कारवाई केली होती. भीमा-कोरेगाव प्रकरणाची चौकशी करणा-या एनआयएच्या टीमने गुरुवारी रात्री फादर स्टेन स्वामी यांना नामकुम स्टेशन हद्दीत येणा-या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं.

महत्वाच्या बातम्या :-

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!