नवी दिल्ली: केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासावरून शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यातील जनतेवर भाजपचे लक्ष आहे. त्यामुळे राज्यात जरा जपून खर्च करा. तुम्ही भाजी खरेदी केलीत तरी तुमच्यावर भाजपचं लक्ष आहे. तुम्ही चिकन खरेदी करायला गेलात तरी तुम्ही किती किलो चिकन घेतलं, काल किती घेतलं, आज किती घेतलं यावर भाजप पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे, ते लगेच ईडीला कळवतील त्यामुळे सर्वांनी सावध राहा. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान अजानचे भोंगे यावरही प्रतिक्रिया देत त्यांनी मनसे आणि भाजपवर टीका केली. राज्य सरकारचे आदेश असूनही अनेक राज्यांमध्ये अजानवरचे भोंगे उतरलेले नाहीत. त्यात भाजपशासित राज्यांचे प्रमाण अधिक आहे. मी गोव्यात होतो, तिथेही मी अनेकदा अजान ऐकायचो, उत्तर प्रदेशातले भोंगे तसेच आहेत. काल महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यांचं पालन व्हायला हवं. असे राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापाठात कुलगुरूंची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. यावरच संजय राऊत यांनी म्हटले की, “त्यांना खाजवायची सवय पडलीये. त्यांची खाज कधी संपेल माहीत नाही. पण एवढीपण खाज बरी नाही.”
महत्वाच्या बातम्या:
मोदी सरकारकडून गोरगरीबांची लूट सुरुच- नाना पटोले
“…तर पोलिसांनी मशिदी सील कराव्यात, अन्यथा राज ठाकरेंना बेड्या ठोका”, ‘वंचित’ची आक्रमक भूमिका
IPL 2022 RR vs RCB : विराट विरुद्ध चहल; दोन संघांपैकी कोणाचं पारडं जड? वाचा!
IPL 2022: राहुलची फिफ्टी ते हैदराबादचा पराभव; SRH vs LSG सामन्यात रचले गेले ‘असे’ अनेक रेकॉर्ड्स !
“मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही…”, राज ठाकरेंच्या टीकेवर अबू आझमींचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

