🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२चा १३वा सामना राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. राजस्थान रॉयल्सने आपल्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये शानदार खेळ दाखवला असून संघ पूर्ण जोमात असल्याचे दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात पराभवाने झाली, पण संघाने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात चांगला खेळ केला आणि विजयाची नोंद केली.
आयपीएल २०२२मध्ये, राजस्थान रॉयल्सचा संघ वेगळ्या शैलीत दिसला आणि संघाने इतर संघांच्या तुलनेत सर्वोत्तम खेळ दाखवला. संघाचे प्रमुख फलंदाज जोस बटलर, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर चांगल्या लयीत दिसत आहेत. दुसरीकडे, देवदत्त पडिक्कल आणि यशस्वी जयस्वाल यांना कमी लेखता येणार नाही. संघाचा गोलंदाजी विभागही सातत्याने विकेट घेत आहे. मागील सामन्यात खेळलेला नवदीप सैनी या सामन्यातही खेळताना दिसणार आहे. लेगस्पिनर युझवेंद्र चहल हा त्याच्या जुन्या संघ आरसीबीच्या फलंदाजांसाठी मोठा धोका असेल.
उभय संघांमध्ये खेळल्या गेलेल्या २५ सामन्यांपैकी १२ सामने आरसीबीने जिंकले आहेत, तर राजस्थानने १० सामने जिंकले आहेत. गेल्या चार सामन्यांमध्ये आरसीबीचा वरचष्मा राहिला आहे. असे असले तरी राजस्थान रॉयल्सचे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सोपे असणार नाही. विराट आपली फलंदाजी दाखवावी लागणार आहे. संघाची मधली फळी थोडी कमकुवत दिसत असली तरी दिनेश कार्तिकने फिनिशर म्हणून संघाला मजबूत केले आहे. एकदा सर्वांच्या नजरा गेल्या सामन्यात ४ बळी घेणाऱ्या वनिंदू हसरंगावर असतील.
महत्त्वाच्या बातम्या –
- “मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही…”, राज ठाकरेंच्या टीकेवर अबू आझमींचे प्रत्युत्तर
- IPL 2022 : प्लेऑफ आणि फायनलबाबत मोठं अपडेट; ‘या’ ठिकाणी रंगणार शेवटचे चार सामने?
- IPL 2022: हैदराबादवर शानदार विजयानंतरही राहुल मात्र नाराज; ‘या’ खेळाडूंना फटकारले
- “गणपती, नवरात्री, विवाह समारंभात…”, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अबू आझमींची पहिली प्रतिक्रिया
- “भाजप केवळ समानतेच्या गप्पा मारत नाही तर…” ; चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
