🕒 1 min read
मुंबई : घरगुती गॅस सिलेंडर महागला असून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. फक्त इतकेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात नाना पटोले यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘मोदी सरकारकडून इंधन दरवाढीतून गोरगरीबांची लूट सुरुच! आज पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी ८० पैशांच्या वाढीसह दोन आठवड्यात इंधनात ९.२० रुपयांची दरवाढ. पाकिटमार भाजपा सरकार’, असे पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, यापूर्वी ‘रशियाकडून बाजारदरापेक्षा ३५ डॉलरच्या डिस्काऊंटने स्वस्त पेट्रोल डिझेल खरेदी करायचे आणि देशवासियांना आठ रुपये महागाने विकायचे! व्वा रे रक्तपिपासू व्यापारी मोदी सरकार’, असे म्हणत नाना पटोलेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 : प्लेऑफ आणि फायनलबाबत मोठं अपडेट; ‘या’ ठिकाणी रंगणार शेवटचे चार सामने?
- “मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही…”, राज ठाकरेंच्या टीकेवर अबू आझमींचे प्रत्युत्तर
- “आधी लगीन रिफायनरीचे नंतर संपर्काचे”, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- VIDEO : “आजही तुझ्या चेहऱ्यावर…”, रॉस टेलरच्या निवृत्तीवर विराट काय म्हणाला माहितीये?
- “गणपती, नवरात्री, विवाह समारंभात…”, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अबू आझमींची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
