मुंबई: आयपीएल २०२२ अतिशय रोमांचक पद्धतीने पुढे जात आहे. सोमवारी सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स (SRH vs LSG) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊ संघाने १२ धावांनी विजय मिळवत मोसमातील दुसरा विजय मिळवला. या सामन्यात हैदराबादचा सलग दुसरा पराभव होण्यासह अनेक रेकॉर्ड रचले गेले आहेत.
सामना जिंकलेल्या लखनऊ सुपरजायंट्सच्या कर्णधार के एल राहुलने (KL Rahul) सामन्यात आपल्या आयपीएल कारकिर्दीतील २७वे अर्धशतक झळकवले. तर दीपक हुडाने मोसमातील दुसरे अर्धशतक झळकावले. हुडाने एका मोसमात दोन अर्धशतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. हैदराबादसाठी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या वॉशिंग्टन सुंदरचा (washington sundar) हा १०० वा टी-२० सामना होता.
तर हा सामना हरताच हैदराबाद आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने गमावणारी टीम बनली आहे. दुसऱ्या डावात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पहिल्या ८ सामन्यांमध्ये ७ सामने जिंकले आहेत. असे केवळ एकदाच घडले, तर त्यानंतरच्या शेवटच्या चार सामन्यांमध्ये चारही वेळा पाठलाग करणाऱ्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. SRH ला या मोसमातील सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर केएल राहुलच्या संघाने या सामन्यात दुसरा विजय मिळवला आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही…”, राज ठाकरेंच्या टीकेवर अबू आझमींचे प्रत्युत्तर
- IPL 2022 : प्लेऑफ आणि फायनलबाबत मोठं अपडेट; ‘या’ ठिकाणी रंगणार शेवटचे चार सामने?
- IPL 2022: हैदराबादवर शानदार विजयानंतरही राहुल मात्र नाराज; ‘या’ खेळाडूंना फटकारले
- “गणपती, नवरात्री, विवाह समारंभात…”, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अबू आझमींची पहिली प्रतिक्रिया
- “भाजप केवळ समानतेच्या गप्पा मारत नाही तर…” ; चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

