Share

‘मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन लावण्याशिवाय येतं तरी काय, खंडणी गोळा करता येते म्हणा’

Published On: 

मुंबई : मुंबईतील खास बाल कोविड काळजी केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन आज उद्घाटन झाले. यावेळी ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ‘राज्यातील ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. राज्यात कोविड रुग्णांसाठी ७०० मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन जेव्हा लागेल तेव्हा कदाचित आपल्याला राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

यावर आता भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागले आहे. भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज लॉकडाऊन संदर्भात केलेल्या एका वक्तव्याची बातमी जोडत ते म्हणाले कि, ‘लॉकडाऊन लावण्याशिवाय तुम्हाला येतं तरी काय खंडणी गोळा करता येते म्हणा.’ असा खरमरीत टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान आज मुख्यमंत्री ठाकरे बोलताना म्हणाले कि, ‘अजूनही करोनाचं संकट टळलेलं नाही. ते आपल्याला टाळायचे आहे. आपण जर अशाच पद्धतीने गर्दी करत राहिलो, कोरोनाबाबतचे नियम पाळले नाही, तर कोरोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधी येईल. गेल्या वेळी आपल्याकडे असलेल्या ऑक्सिजनच्या साठ्यात विशेष काही वाढ झालेली नाही. त्यामुळे रुग्ण वाढले आणि असलेल्या साठ्यापर्यंत पोहोचलो, तर आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल.’ असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!