बारामती : सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी असतानाही बैलगाडी शर्यत भरवणे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर विनापरवाना सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचा भंग करुन बैलगाडी शर्यत घेतल्यामुळे पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पडळकरांनी शर्यत घेतल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका होत आहे.
मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच राज्य सरकारच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बैलगाडा शर्यत चालू व्हावी अशीच राज्य सरकारची भूमिका आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाची निर्णयामुळे परवानगी देता येत नाही. सरकारपेक्षा कोर्टाच्या निर्णयाला महत्व आहे. बैल हा पाळीव प्राणी म्हणून न गणता वन्यप्राणी म्हणून गणला गेला. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्यात असे पवार म्हणाले. ते बारामतीत बोलत होते.
‘बैलगाडा शर्यत हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. संसदेत अनेकदा हा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. सध्या काहीजण स्टंटबाजी करत आहेत. जे स्टंट करतात त्यांचंच मागच्या पाच वर्षात सरकार होते. त्यांना कोणीही अडवले नाही. आताही केंद्रात त्यांचेच सरकार आहे. सध्या केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. आम्ही लोकांचे भले करतोय असे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे’ असे म्हणत अजित पवारांनी नामोल्लेख न करता गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप’, नीलम गोऱ्हेंचा शाब्दिक बाणांतून हल्ला
- ‘तहसीलदार ज्योती देवरे’ प्रकरणाला वेगळे वळण, प्रशासकीय अहवालातून धक्कादायक बाब उघड
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- पोलिसांना दिलेले चॅलेंज अंगलट! बैलगाडी शर्यत प्रकरणी पडळकरांसह ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

