शिलाँग: देशातील पाच राज्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईशान्येकडील राज्य मेघालयमध्ये मोठा राजकीय धमाका झाला. राज्यातील कॉँग्रेसच्या सर्व आमदारांनी मोठे बंड केले आहे. सर्व पाच आमदारांनी कॉँग्रेस पक्षाला राम राम करत सत्ताधारी नॅशनल पीपल्स पक्षात प्रवेश केला. नॅशनल पीपल्स पक्षाची इतर मित्र पक्षा सोबत मेघालय मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अंतर्गत सत्ता आहे. नॅशनल पीपल्स पक्ष त्यात मोठा पक्ष आहे.
मुख्य म्हणजे मेघालय मध्ये कॉँग्रेस हा एकमेव मोठा विरोधी पक्ष होता. आता आघाडीचे संख्याबळ ४६ झाले आहे. आता विधानसभेत ऑल इंडिया तृणमूल कॉँग्रेस पक्षाचे १२ आणि इतर दोन लहान पक्षांचे प्रत्येकी एक असे १४ आमदार विरोधी पक्षात आहेत. यापूर्वी कॉँग्रेसचे निवडून आलेले १२ आमदार तृणमूल कॉँग्रेस मध्ये गेले तर उरलेले ५ आमदार आज सत्ताधारी आघाडी मध्ये गेले असल्याने कॉँग्रेसचा मेघालय राज्यात एकही आमदार शिल्लक नाही अशी परिस्थिति निर्माण झाली आहे.
कॉँग्रेसच्या पाच आमदारांनी एक बैठक घेऊन हा मोठा निर्णय घेतला. सर्वांच्या स्वाक्षरीचे एक पत्र मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना पाठविले. यामुळे कॉँग्रेसला या राज्यात मोठा धक्का बसला आहे. यावर बोलताना अम्पारीन लिंगडोह यांनी काँग्रेस पक्ष सोडण्यामागची भूमिका स्पष्ट केली. आमची फसवणूक होत असून त्यावर कुणीच काही कारवाई करत नाही. त्यामुळेच आम्हाला हा पक्ष सोडवा लागला आहे. पाचही आमदारांचं सदस्यत्व टिकून राहणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच आम्ही सत्ताधारी आघाडीसोबत जात आहोत असे लिंगडोह यांनी सांगितले.
मेघालय राज्यात पुढील वर्षी निवडणूका आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाली असून कॉँग्रेस आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. २०१८ मध्ये निवडणुकीत २१ जागा जिंकून काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, काँग्रेसला सत्तेपासून दूरच राहावं लागलं होतं. भाजपच्या नेतृत्वाखालील नॉर्थ इस्ट डेमोक्रेटिक अलायन्समधील घटक असलेल्या एमडीएने तेव्हा सरकार स्थापन करण्यात यश मिळवलं होतं.
महत्वाच्या बातम्या:
-
किरीट सोमय्या यांचे आम्ही पुणे महानगरपालिकेत जंगी स्वागत करणार, भाजप पधाधिकाऱ्याची घोषणा…
-
‘मोदींच्या ‘या’ कार्यक्रमामुळेच देशात कोरोना पसरला’; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
-
शोएब अख्तरची याने सांगितली लता मंगेशकर यांच्या बरोबरची एक आठवण…
- ‘अजित पवारांनी आयुष्यभर जमीनी लाटण्याचं काम केलं’; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
