Share

‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सात महिन्यांपासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर कृषी आंदोलन चालू आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत केंद्र सरकारने अनेक उपाय करूनही शेतकरी मागे हटायला तयार नाहीत. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्राच्या कृषी कायद्यावर आपली भूमिका मांडली आहे. ‘कृषी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी दुरुस्ती विधेयक आणले पाहिजे. ते अधिक चांगले होईल, असे शरद पवार म्हणालेत. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावरून भारतीय जनता पक्षाते महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ आणि इतके वर्षे कृषीमंत्री राहिले तरी महाराष्ट्रातील शेतकरी समाधानी का नाहीत? असा प्रश्न राणे यांनी विचारला आहे.

निलेश राणे यांनी ट्विट केले आहे की, ‘इतके वर्ष केंद्रात मंत्री राहून त्यातले अनेक वर्ष देशाचे कृषिमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी आता तरी शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे प्रयत्न सोडावे. आज कृषी दिनानिमित्त प्रश्न पडतो की जर पवार कृषी तज्ज्ञ व इतके वर्ष कृषीमंत्री राहिले तरी महाराष्ट्राचा शेतकरी समाधानी का नाही?’.

काय म्हणाले होते शरद पवार?
पंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांची भूमिका तीव्र आहे. ते उठायला तयार नाहीत. तसेच आता चर्चा करायलाही तयार नाहीत. केंद्र सरकारसोबत त्यांच्या नऊ दहा बैठका झाल्या. त्यात तोडगा निघाला नाही. त्यामुळे ते उठायला तयार नाहीत. त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते योग्य नाही.

काल भाजपच्या लोकांनी तिथं गोंधळ घातल्याचं ऐकलं. सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. कृषी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी दुरुस्ती विधेयक सरकारनं आणलं पाहिजे. ते अधिक चांगले होईल, असे पवार म्हणाले. तसेच दोन दिवसाच्या अधिवेशनात कृषी कायदा येईल असे वाटत नाही, पण आला तरी सगळ्यांशी चर्चा करून येईल असे मला वाटते, असंही त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!