Share

बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण जनसंवाद; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती

Published On: 

🕒 1 min read

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे हे राज्यभर दौरा करत आहेत. ‘आरक्षण जनसंवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते समाजातील नागरिकांशी चर्चा करत आहेत. उद्या शुक्रवारी संभाजीराजेंच्या उपस्थितीत बीडमध्ये हा आरक्षण संवाद होणार आहे. शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस ते बीड दौऱ्यावर असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.

आयोजकांच्या माहितीनुसार, शुक्रवारी छत्रपती संभाजीराजे नगर जिल्ह्यातून आष्टीत दुपारी साडेबारा वाजता येणार आहेत. तेथे स्वागत स्वीकारल्यानंतर जामखेड येथे दुपारी १ वाजता थांबतील. अडीच वाजता पाटोदा येथे आगमन होईल. साडेतीन वाजता पिठी नायगाव येथे स्वागत होईल. दुपारी साडेतीन वाजता मुर्शदपूर फाटा येथे सत्कार व संवाद होणार आहे. सायंकाळी पाच वाजता बीडमध्ये संभाजीराजेंचे आगमन होईल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्ह्याच्या वतीने त्यांचे स्वागत केले जाईल. त्यानंतर नगर रोडवरील समर्थ लॉन्स येथे आरक्षण जनसंवाद कार्यक्रमाला सायंकाळी साडेपाच वाजता ते संबोधित करणार आहेत. बीडमध्ये त्यांचा मुक्काम राहणार असून ३ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता पाडळशिंगी, पावणेदहा वाजता गढी, दहा वाजता गेवराईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधून ते औरंगाबादकडे रवाना होतील. आरक्षण जनसंवादाला उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!