सोलापूर : विधान परिषदेतील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर काल सोलापुरात दगडफेक झाली होती. याला राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप पडळकर यांनी केलाय. दरम्यान, दुसरीकडे आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापुरात संचारबंदी लागू असतानाही आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भवानी पेठ परिसरातील अक्कमहादेवी मंदिर, स्टेट बॅंक कॉलनी येथे झालेल्या घोंगडी बैठकीत कोरोना नियमांचे पालन करता गर्दी जमवली, सोशल डिस्टन्सिंग न ठेवता लोकांच्या जीवितेला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याचा गुन्हा आमदार पडळकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात आयोजक संजय कणके, प्रकाश कारंडे, संजय पुजारी, राजू बंडगर, संतोष कारंडे, प्रकाश आनंदकर, रवी हाक्के, सचिन पाटील, समर्थ माशाळकर, अजय रूपनर, शरणू हांडे, परदेशी, बिपिन पाटील व इतर दहा ते पंधरा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना नियमाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी पोलीस शिपाई आसिफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम १८८, ३३६, २६९ आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २००५ चे कलम ५१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार पाटील करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण जनसंवाद; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती
- ‘राज्यपालांच्या सगळं लक्षात आहे, फक्त ते आमदारांच्या यादीचे विसरलेत’, ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा टोला
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
- ‘बातमीत राहायचे असेल शरद पवारांबद्दल खालच्या पातळीत बोला!’, आव्हाडांनी सांगितला उपाय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
