Share

घडलंय बिघडलंय! ‘आमचं कोणी ऐकत नाहीत, फोनही उचलत नाही’, आघाडीतील ‘हा’ पक्षनेता नाराज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये एकीकडे बैठका सुरू असून कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे महविकास आघाडीतील आणखी एक घटक पक्ष नाराज झाला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

‘मुख्यमंत्री भेट देत नाही. आदित्य ठाकरे सुद्धा जनतेच्या प्रश्नावर भेट देत नाही. गणपती उत्सवाला वेळ आहे तरी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. पण बकरी ईद जवळ आली असतानाही नियमावली जाहीर करत नाही’, अशी नाराजी आझमींना व्यक्त केली.

समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी म्हणाले की, आमची गरज असेल तेव्हाच बोलवू नका, महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नको म्हणून आम्ही महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. परंतु या सरकारमध्ये कोणीही ऐकत नाही. फोन उचलत नाही. बकरी ईदबाबत अद्याप नियमावली काढली नाही. १-२ दिवसांत नियमावली काढू असं म्हणतात. परंतु समाजातील लोकांना बोलावून चर्चा करा आणि नंतर नियमावली काढा असं मी मागणी केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!