Share

‘बायकोने मारले तरी म्हणतील की यात मोदी सरकारचा हात आहे!’, फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी इथं देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत बोलत असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यावेळी बोलत असतांना ठाकरे सरकारवर जोरदार फटकेबाजी करत ते म्हणाले की,’अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची पुरेशी रक्कम मिळालेली नाही. आपल्या सरकारच्या काळात आपण किती रक्कम प्रत्येक जिल्ह्याला दिलेली होती, हे मुद्दे त्यांनी या भाषणात अधोरेखित केले. राज्य सरकार स्वतः भ्रष्टाचार करत आहे आणि मदत द्यायची वेळ आली की केंद्राकडे बोट दाखवत आहे,’ अशा आशयाची टीका करत त्यांनी ठाकरे सरकारवर चांगलीच टोलेबाजी केली आहे.

दरम्यान, पुढे बोलत असतांना फडणवीस म्हणाले की,’हे सरकार इतकं लबाड आहे की काहीही झालं तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात.’ तसेच ‘मला तर असं वाटतंय की यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की केंद्र सरकारचा हात आहे, असे लबाड लोक इथं आहेत’, असेही यावेळी बोलतांना ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!