मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची चौकशी करत असलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे म्हणजेच एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. एनसीबीकडून वानखेडेंची खाते अंतर्गत चौकशी होणार आहे. त्यासाठी एनसीबीचं पथक मुंबईत दाखल झालं आहे. मात्र त्याआधीच वानखेडेंची चौकशी मुंबई पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे. सहाय्यक पोलीस दर्जाच्या अधिकाऱ्याकडून वानखेडेंची चौकशी होणार आहे. आर्यन खानच्या अटक प्रकरणात वानखेडेंना 8 कोटी रुपये मिळणार होते, असा गंभीर आरोप कारवाईवेळी साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल यांनी केला. या आरोपांची चौकशी मुंबई पोलीस करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडेंवर सातत्यानं आरोप होत आहेत. मंत्री नवाब मलिक दररोज पत्रकार परिषद घेऊन वानखेडेंनी केलेल्या कारवाया, त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी वापरलेली कागदपत्रं याबद्दल गंभीर आरोप करत आहेत. याची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. वानखेडे यांच्या विरोधात दाखल झालेल्या सर्व तक्रारींची चौकशी त्यांच्याकडून केली जाणार आहे. आतापर्यंत मुंबईतील चार पोलीस ठाण्यांमध्ये वानखेडे यांच्याविरोधात तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.
क्रूझवरील कारवाईवेळी उपस्थित असलेले पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडेंसह इतरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचा प्राथमिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मंगळवारी रात्री प्रभाकर साईल यांचा रेकॉर्ड कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आला. डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यानं प्रभाकर यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर तपासाला सुरुवात झाली. सध्या मुंबई पोलीस इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- समीर वानखेडेंच्या मालदीव दौऱ्याची चौकशी व्हावी; नवाब मलिकांची मागणी
- ‘जलयुक्त शिवार मध्ये’दूध का दूध पानी का पानी’ झालं,सरकारच्या समितीनंच आरोप करणा-यांचं तोंड रंगवलंय’
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

