नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी समित्या महाविकास आघाडी सरकारने स्थापन केल्या होत्या, याबाबत जलसंधारण विभागाने नुकताच अहवाल दिला असून त्यात जलयुक्त शिवार योजनेत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हणत फडणवीसांना क्लीन चीट देण्यात आलीआहे. उलट जलयुक्त शिवार योजनेमुळे पीक पेरणी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
सुरुवातीपासूनच जलयुक्त शिवार हे तांत्रिक दुरुस्त्या नापास झालेलं अभियान आहे, अशी टीका झाली होती. शिवाय जलयुक्त शिवारच्या कामातल्या गैरव्यवहारावर काही चौकशी समित्या स्थापन झाल्या होत्या. आता ‘जलयुक्त’ला सरकारकडूनच क्लीन चिट मिळाली आहे. याबाबत जलसंधारण विभागाचा अहवाल समोर आला आहे. ‘जलयुक्त शिवार अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा’ झाली असल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. जलसंधारण विभागाच्या अहवालात या योजनेमुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं असल्याचं म्हटलं आहे. 1,76,284 पैकी 58 हजार जलयुक्तच्या कामांचं मूल्यमापन केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
जलयुक्त शिवार मध्ये’दूध का दूध पानी का पानी’ झालं..
सरकारच्या समितीनंच आरोप करणा-यांचं तोंड रंगवलंय
एकीकडे @Dev_Fadnavis यांच्या स्वच्छ कामाची पावती दिलीय
तर
भ्रष्टाचाराचं शिवार समजून #MVA जनतेची लूट करतीयेभ्रष्टयुक्त सरकार’विरूद्ध लढा सुरूच राहील
ना खाऊंगा ना खाने दूंगा..!!
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 27, 2021
दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या,जलयुक्त शिवार मध्ये’दूध का दूध पानी का पानी’ झालं.. सरकारच्या समितीनंच आरोप करणा-यांचं तोंड रंगवलंय असं म्हणत त्यांनी सरकारवर तोफ डागली. पुढे त्या म्हणाल्या, एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ कामाची पावती दिलीय तर भ्रष्टाचाराचं शिवार समजून MVA जनतेची लूट करतीये. भ्रष्टयुक्त सरकार’विरूद्ध लढा सुरूच राहील. ना खाऊंगा ना खाने दूंगा..!! असे म्हणत चित्रा वाघ यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- राज्य सरकारची क्रुझवरील पार्टीला परवानगी नव्हती- नवाब मलिक
- नाव फलकावरून खा.भावना गवळींचे नाव वगळल्याने शिवसैनिकांत संताप


