Share

समीर वानखेडेंच्या मालदीव दौऱ्याची चौकशी व्हावी; नवाब मलिकांची मागणी

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर आणखी एक मोठा आरोप केला आहे. मालदीव आणि दुबईतील फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून एनसीबीच्या वसुलीबद्दल ते बोलले आहेत. मलिकांच्या आरोपावर समीर वानखेडेंनी उत्तर दिलं होतं.

नवाब मलिक खोटारडे आहेत आणि वानखेडे मालिकांवर या प्रकरणी कायदेशीर कारवाई करतील, असं एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा कायम आहे. नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि त्यांच्या बहिणीवर गंभीर आरोप केले.

नवाब मलिकांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या मालदीव दौऱ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. मालदीवमधील फोटो शेअर करून समीर वानखेडे यांच्या कुटुंबातील सदस्य तिथे उपस्थित होते, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला अजून एक वळण लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!