मुंबई : ‘नारायण राणे यांना केलेली अटक हे बेकायदेशीर होती. अनिल परब यांनी अटकेचे आदेश दिले ते गृहमंत्री आहेत का? त्यामुळे शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याचे आम्ही वर्तमान पत्रात वाचले आहे. गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असतांना अनिल परब घूसखोरी कशी करतात, असे भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले.
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून शिवसेनेवर हल्ला चढवला. यावेळी शेलार यांनी थेट पवारांसोबत घडलेल्या घटनेचा दाखलाच दिला. शरद पवारांना कानशिलात लावलेली देशाने पाहिली. त्यावेळी शरद पवारांनी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केलं. पण संयमी माणसासोबत राहूनही शिवसेनेला ते कळत नाही, अशी टीका शेलार यांनी केली.
शिवसेनेला नारायण राणे यांच्या वक्तव्यावर राग नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वातंत्र्यदिनाचं अज्ञान उघड झालं त्याचा थयथयाट आहे. १५ ऑगस्टरोजी महाराष्ट्राला संबोधित करताना मुख्यमंत्री हा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव याबाबत अज्ञान जाहीर करतायेत. की जाणुनबुजून केले जातेय की अजाणतेपणे झालंय? १५ ऑगस्ट हा देशवासियांच्या अभिमानाचा दिवस असताना मुख्यमंत्री मुख्य सचिवांना विचारतायेत. हे लपवण्याचा त्यांचा थयथयाट आहे असा आरोप त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानकडून विंडीजचा १०९ धावांनी पराभव, मालिका १-१ अशा बरोबरीत
- ‘सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा’ ; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- ‘त्या’ १०० कोटी रुपयांच्या मालमत्तेशी माझा दमडीचाही संबंध नाही, भुजबळांचा दावा
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

