Share

दुसऱ्या डोसनंतरही पुणेकरांना कोरोनाची लागण, अजितदादांनी सांगितले कारण

Published On: 

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं. पुण्यात दुसरा डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. याविषयी बोलताना अजित पवारांनी रोखठोक भाष्य करत पुणेकर नियम पाळत नसल्याचं स्पष्ट म्हंटल आहे. नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोनाबधित होत आहेत. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजेत, फिजीकल डिस्टन्सिंगचं पालनं केलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

गेल्या आठवड्यात ५ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणामध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. लसीकरणानंतर किती जणांना कोरोनाची बाधा होते यासाठीचे एक सर्वेक्षण पुण्यात झाले असल्याचे अजित पवारांनी सांगितले. त्यामध्ये ०.१९ टक्के इतक्यांना पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले आहे. तर दुसरा डोस घेतल्यानंतर ०.२५ टक्के इतक्या जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे.

दुसरा डोस घेतल्यानंतर नागरिक नियम पाळत नाहीत. म्हणूनच दुसऱ्या डोसनंतरही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. अनेक नागरिकांकडून मास्क न वापरणे, कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करणे यामुळेच कोरोनाची लागण होत असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. त्यामुळे लस घेतली म्हणजे कोरोनाचे नियम पाळायचे नाहीत ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!