🕒 1 min read
अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना रविवारी खेळला जाणार आहे. पहिल्या टी-२० सामन्यात निराशाजनक कामगिरी करत पराभव पत्करणाऱ्या भारतीय संघाचे या सामन्यामध्ये दमदार पुनरागमन करण्याचे लक्ष्य असेल. पहिल्या सामन्याच्या खेळपट्टीवर नक्की काय केले पाहिजे हे आम्हाला कळले नाही, अशी कबुली सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिली. परंतु, या मालिकेचे सर्वच सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले जाणार असल्याने भारताला या खेळपट्टीवर कसा खेळ करायचा याचा लवकरच शोध लावावा लागणार आहे.
दरम्यान पहिल्या सामन्यात टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले होते. त्यामुळे संघात रोहित शर्माला संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. रोहितला संधी मिळणार की नाही, हे तर उद्याच समजेल. पण टीम इंडिया आपल्या फलंदाजीच्या शैलीत कोणताही बदल करणार नाही. असं म्हटलंय फलंदाज श्रेयस अय्यरने.
“पराभव झाला असला तरीही आम्ही आमच्या बॅटिंग करण्याच्या शैलीत कोणताही बदल करणार नाही. आपल्या बॅटिंगमध्ये खोली आहे. शेपटीच्या फलंदाजांमध्येही फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे बॅटिंगमध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही. आम्ही रणनिती आखली आहे. त्यानुसार आम्हाला काम करावे लागेल. कारण आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही सीरिज महत्वाची आहे. या मालिकेत आम्हाला अनेक प्रयोग करायचे आहेत”, असं अय्यरने स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले


