🕒 1 min read
शिरूर : अभिनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असणारे अमोल कोल्हे यांना आज कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे खासदार कोल्हे यांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. दरम्यान आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहे. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.
अमोल कोल्हे यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देत एक ट्वीट केलं आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.
माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी.शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे.’ असे आवाहन त्यांनी त्यांच्या ट्वीटमधून केले आहे. दरम्यान आता कोल्हेंना किमान १४ दिवस आता विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे बंद पडलेली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्याच्या त्यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांना तूर्तास ब्रेक लागला आहे. या आठवड्यातच ते यासंदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार होते. केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री परषोत्तम रुपाला यांनाही ते भेटणार होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो पण…’; छत्रपती संभाजीराजेंचा गौप्यस्फोट
- ‘संभाजी भोसलेंना अटक करा’; गुणरत्न सदावर्ते यांची स्फोटक मागणी
- ‘गोमूत्र शिंपडणारे समोर आले असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो’
- संभाजीराजेंनी केलं प्रकाश आंबेडकरांच कौतुक; तर अशोक चव्हाणांवर हल्लाबोल
- अशोक चव्हाणजी, आम्हीही ९६ टक्केवाले मराठे आहोत!’, संभाजीराजेंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
