Share

‘मी त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो पण…’; छत्रपती संभाजीराजेंचा गौप्यस्फोट

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेडमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे मूक आंदोलन सुरु आहे. यावेळी मूक आंदोलनाला संबोधित करताना छत्रपती संभाजीराजेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मला समाजाची भावना मांडायची आहे. त्यामुळे संसदेत घटना दुरुस्तीवर बोलण्यासाठी मी परवानगी मागितली होती. पण मला परवानगी नाकारली गेली. महाराष्ट्रातील खासदारांमुळे मला बोलायला संधी देण्यात आली. पण त्यावेळी ती संधी दिली नसती तर त्याच मी दिवशी खासदारकी सोडणार होतो, असा गौप्यस्फोट छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.

कोणतीही गोष्ट भांडल्याशिवाय मिळत नाही हे माझ्या लक्षात आलं. आपल्याकडे समाजाची ताकद आहे. शिव-शाहूंचा वारसा आहे. हा वारसा गप्प बसणार का? शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला धुडाकवून लावलं होतं. त्यामुळे त्याच दिवशी मी ठरवलं होतं. त्या दिवशी बोलायला दिलं नसतं तर अरे कुठली खासदारकी सोडून टाकली, असं म्हणून मी बाहेर पडणार होतो, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

ज्या शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यांच्या पणतूला तुम्ही दोन मिनिटं बोलायला देत नसाल तर उपयोग काय माझा? असा सरकारला सवाल करत मी माझ्या भाषणाला त्यावेळी सुरवात केली, असेही संभाजीराजेंनी आज नांदेडमध्ये बोलताना सांगितले.

दरम्यान, आता केंद्र आणि राज्य सरकार आरक्षणाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. पण आम्हाला त्याच्याशी काहीच घेणं-देणं नाही. आम्हाला आरक्षण हवं आहे, असं छत्रपती संभाजीराजेंनी यांनी ठसकावून सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!