Share

‘संभाजी भोसलेंना अटक करा’; गुणरत्न सदावर्ते यांची स्फोटक मागणी

Published On: 

मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात आज नांदेडमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे मूक आंदोलन केलं. मराठा समाजाला अद्यापही आरक्षणाची प्रतीक्षा असून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाज हा आक्रमक झाला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता मराठा समाज हा पुन्हा रस्त्यावर उतरला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण विरोधातील याचिकाकर्ते ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी आता संभाजीराजेंसह आंदोलकांवर हल्लाबोल केला आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर अशाप्रकारे आंदोलन करणं हे चुकीचे आहे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संभाजी भोसले यांना अटक केली पाहिजे. यासंदर्भात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने आदेश करायला पाहिजे होते.आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे,’ अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

पुढे ते म्हणाले, इतर मुद्द्यांवरून अजित पवारांच्या घराबाहेर काही व्यक्तींनी आंदोलन केलं तेव्हा त्यांना १५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं. आता खासदार संभाजींसाठी विशेष व्यवस्था का ? ते कायद्यापेक्षा मोठे आहेत का ? त्यामुळे जे आंदोलनकर्ते जमले आहेत त्यांना त्या ठिकाणावरून पांगवा, कोरोना संक्रमण थांबवा अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. तसेच, संभाजी छत्रपती यांनी वादग्रस्त विधान केलं आहे, त्याची देखील चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे मी पोलिस अधीक्षक शेवाळे यांच्याकडे मागणी करतोय ताबडतोब त्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अटक करावी,’ असं देखील सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!