🕒 1 min read
नागपूर:-कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे आवश्यक आहे. परंतु यानंतरही अनेक जण मास्क परिधान करीत नसल्याचे दिसून येत आहे. मास्क न घातल्यास पूर्वी २00 रुपये दंड वसूलण्यात येत होता. परंतु आता सोमवार १४ सप्टेंबरपासून या दंडामध्ये वाढ करून तो ५00 रुपये करण्यात आला असून, याची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. विभागीय आयुक्तालयात कोरोनासंदर्भातील आढावा बैठक घेतल्यानंतर देशमुख हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हजारो नागरिक शहरात विनामास्कने फिरत आहेत. त्यांच्याविरुद्ध गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
आता कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्वच विभागाच्या अधिकार्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय सर्व प्रशासनाने एकत्र येत वाढत असलेला कोरोना बाधितांचा आकडा कमी करीत, मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना केल्या आहेत. मोठय़ा प्रमाणात पोलिसही बाधित होत आहेत. ३७५ वर पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पोलिसांना देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या उपचाराची कशी सोय करता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:-
- अहमदनगरचे पालकमंत्री हरवले आहेत; मुश्रीफ म्हणाले, मी गुरुवारी येतोय
- ऐन कोरोनाच्या काळात या आमदार महोदयांना हवाय जनता दरबार, काय आहे प्रकरण ?
- खाजगी रुग्णालयात 30 टक्के खाटा राखीव ठेवा, या मंत्र्यांचे यवतमाळ मध्ये आदेश
- मुख्यमंत्रीसाहेब कोट्यांनी शेतकऱ्यांचं पोट भरत नाही; अनिल बोंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- वर्धा वासियांच्या समस्या सोडविताना या माजी आमदाराला कोरोनाने वेढले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
