Share

NSDL च्या विधानानंतरही अदानींच्या शेअर्समधील घसरण काही केल्या थांबेना

Published On: 

मुंबई : काल म्हणजेच आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार खुलताच एका ट्विटने खळबळ उडवून दिली. आठवड्यातील पहिला दिवस मात्र दिवसाची सुरूवात आर्थिक जगतात मोठ्या धमाक्याने झाली आहे. शेअर बाजारातील आजवरच सर्वात मोठा हर्षद मेहता स्कॅम उघड करणाऱ्या सुचेता दलाल यांनी हे ट्विट केले होते.

‘सेबीकडे असलेल्या ट्रॅकिंग यंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या बाहेर असलेला आणि उघडकीस येण्यास अवघड असलेला आणखी एक घोटाळा. एका समूहाच्या मूल्यात सातत्याने हेराफेरी सुरु आहे. परदेशातील संस्थ्यांच्या मदतीने हा सगळा प्रकार सुरु आहे. तेच त्यांचे वैशिष्ट्य आहे, काहीच बदलले नाही’ अशा आशयाचे ट्वीट सुचिता दलाल यांनी केले होते.

गेल्या वर्षभरापासून गौतम अदानी हे नाव सातत्यानं चर्चेत आहे. एका वर्षात अदानी ग्रुपचे शेअर्स इतक्या वेगानं वाढले की जगातल्या श्रीमंतांच्या यादीतही त्यांनी झपाट्यानं वरचं स्थान मिळवलं. मात्र आज शेअर बाजारात याच अदानींबद्दल एका बातमीनं संशयाचं वातावरण निर्माण केलंय. अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या तीन परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची खाती गोठवली नसल्याचा खुलासा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड अर्थात एनएसडीएलने केल्यानंतरही आज मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरण फारशी थांबली नाही.

एनएसडीएलने अदानी समूहात तब्बल 43 हजार 500 कोटींची गुंतवणूक असणाऱ्या अब्दुल्ला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रिस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांची खाती गोठवली. तसंच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग अॅक्टअंतर्गत बेनीफिशियल ऑफ ओनरशिपची म्हणजेच या कंपन्यांच्या मालकीविषयीची माहिती देणं अत्यावश्यक आहे, मात्र त्यात पुरेशी पारदर्शकता नसल्याने एनएसडीएलनं ही कारवाई केली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटल्याची अफवा पसरली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!