Share

देगलूरला ‘मोदी मोदी’ करूनही भाजपला माती खावी लागली; ‘सामना’तून राऊतांचा प्रहार

Published On: 

मुंबई : दादरा नगर हवेलीमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला आहे. महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदाच असा विजय मिळाल्याने शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. एकंदरीत १३ राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला हादरा बसला आहे. देगलुरला ‘मोदी मोदी’ करूनही भाजपला माती खावी लागलीये, अशी टीका संजय राऊतांनी आजच्या सामनातील अग्रलेखातून केली आहे.

राऊत लिहीतात, ऐन दिवाळीत भारतीय जनता पक्षाचे कंदील विझले आहेत. हा शुभशकुन नाही. आपणच अजिंक्य आणि अजेय आहोत या त्यांच्या अहंकारासही पोटनिवडणुकांच्या निकालांनी तडा गेला आहे. महाराष्ट्राच्या विजयाचे दमदार पाऊल देशपातळीवर पडले आहे. या पावलाखाली सर्व अमंगल, अन्याय चिरडून जाईल. महाराष्ट्र व जनतेची भरभराट होईल, अशा शुभेच्छाही राऊतांनी दिल्या आहेत.

दादरा-नगरच्या विजयाने शिवसेनेची, हिंदुत्ववाद्यांची,अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांची दिवाळी अधिक तेजोमय झाली. शिवसेना महाराष्ट्राबाहेर काय दिवे लावणार? असे प्रश्न ज्यांना पडत होते त्यांनी शिवसेना विजयाचे हे तेजस्वी दीप पाहायलाच हवेत, तसेच मुंबईतील ‘दादर’ ते ‘दादरा’ असा हा शिवसेनेचा प्रवास आहे, असेही ते म्हणाले.

कुणाला दिवाळीनंतर बॉम्ब फोडायचे असतील तर ते फोडावेत. त्या बॉम्बमध्ये दारू शिल्लक आहे काय तेवढेच एकदा बघा. नाही तर हसे व्हायचे. दिवाळीचा सण आनंदाने, उत्साहाने साजरा करावा असा विजय महाराष्ट्राने मिळवला आहे. महाराष्ट्राच्या विजयाचे दमदार पाऊल देश पातळीवर पडले आहे. या पावलाखाली सर्व अमंगल, अन्याय चिरडून जाईल. महाराष्ट्र व जनतेची भरभराट होईल, हीच शुभेच्छा, असं शिवसेनेने म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!