तुळजापूर : करोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस लाँकडाऊन वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसताना शहरी भागात माञ व्यापारी वर्गाकडील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकऱ्यांसह सर्वासामान्य लोकांना याचा अर्थिक फटका बसतो आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी शासनासह सर्वच जण माणुसकीचे दर्शन घडवुन मदत करीत आहे .माञ इकडे दुकानदारांनी वस्तुंचा किंमतीत वाढ केली आहे.
एका बाजूला शेतकऱ्यांना शेतात पिकविलेल्या भाज्या, फळे, फुले यांसह अन्य माल कवडीमोल भावात विकावा लागतो आहे किंवा फेकुन टाकावा लागतो आहे.
माञ हाच माल फळे – भाज्या किरकोळ विक्रेता व्यापारी वर्गाकडे आला की त्याचे भाव दुप्पट – तिप्पट किमतीने वाढतात.आणि त्याच दरात नागरिकांना ते खरेदी करावे लागतात. द्राक्षबागायतदाराकडे द्राक्षभाव २५ ते २८ रुपये किलो आहे.तर त्याच द्राक्षाचा भाव व्यापारी वर्गाकडून साठ रुपये ते सत्तर रुपये किलोने विकला जात आहे .कलिंगड शेतकऱ्यांकडे १० ते १५ रुपये तर व्यापारी वर्गाकडे ३५ ते ४० रुपयाने विकले जात अशी एकंदरीत भाज्या इतर फळांच्या दराची परिस्थिती आहे. १२ ते १५ रुपयाचे नारळ २५ रुपयाला मिळत आहे.
सध्या शासानापासून ते आरोग्य, पोलिस महावितरण खात्यातील मंडळी जीव धोक्यात घालुन सकंटात मदतीस पुढे येत आहे शेतकरी तर नुकसान सहन करुन आपल्या बागांमधील लाखो रुपयाचा माल व लाखो रुपये रोख रक्कम कोरोना ग्रस्तांसाठी देवुन मदत करीत आहे विविध संस्था दानशूर व्यक्ती आपल्या परीने कोरोनाच्या तावडीत सापडलेल्या गरजवंताना मदत करीत आहेत. माञ अडचणीच्या काळात सर्वच नव्हे तर काही व्यापारी जीवनावश्यक किमती वाढवुन जनतेला संकटात टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

