Share

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ईएसआयसीचे रूग्णालय उभारणार-कामगार मंत्री हसन मुश्रीफ

Published On: 

मुंबई : राज्यातील प्रत्येक कामगारांना तसेच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ई.एस.आय.सी) किमान ३० बेडचे एक रूग्णालय उभारण्यात येणार आहे. या महामंडळाच्या दहा किलोमिटरपुढे एक रूग्णालय ही अट काढण्यात येणार असून आता लोकसंख्या तसेच आवश्यकतेनुसार रूग्णालय उभारण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री तथा कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

कर्मचारी राज्य विमा महामंडळच्या महाराष्ट्र क्षेत्र प्रादेशिक बोर्डाची ११२ वी बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस ग्रामविकास व कामगार मंत्री तसेच ई.एस.आय.सी.चे अध्यक्ष हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा ई.एस.आय.सी.चे उपाध्यक्ष राजेश टोपे, केंद्रीय आरोग्य सचिव डॉ.निलिमा केरकट्टा, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल तसेच महामंडळावर नियुक्त सदस्य ऑनलाईन तसेच ऑफलाईन उपस्थित होते.

कोविड काळात ई.एस.आय.सी.च्या रूग्णालयाने केलेल्या कामगिरीचे कौतुक करून राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या रूग्णालयांना प्राधान्याने सर्व सोयीसुविधा देण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कोल्हापूर येथे लवकरात लवकर एक रूग्णालय उभारण्यात यावे, अशा सूचना कामगार मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!