मुंबई : रूग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसची (ESIC hospital to recruitment ) संख्या कमी असल्याने ती तत्काळ भरण्यासाठी एम.पी.एस.सी. प्रमाणे किंवा थेट समुपदेश आणि मेरीट आधारित रिक्त पदावर भरती करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कामगारांना योग्य सुविधा मिळाली नाही असे होऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स तसेच नर्सेसची पदे भरण्यास यावी, त्याचप्रमाणे भरती प्रक्रियेस मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्यात यावी, असे निर्देश टोपे यांनी यावेळी दिले. ते मुंबईत आढावा बैठकीत बोलत होते.
महामंडळाकडे दाव्यांची प्रतिपूर्ती तत्काळ आणि जलदगतीने व्हावी, यासाठी आवश्यक मनुष्यबळाची तात्काळ भरती करण्यात यावी. दावा प्रतिपूर्तीमध्ये तामिळनाडू तसेच केरळ ही राज्ये पुढे असून त्यांनी अवलंबलेली पद्धत घेण्यात यावी. दावा प्रतिपूर्तीची प्रक्रिया १५ दिवसांच्या आत पूर्ण करावी, यासाठी एक निश्चित कार्यशैली तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाची रूग्णालये अधिक सक्षमपणे तसेच सर्व कामगारांना योग्य सुविधा मिळण्यासाठी पीपीपी तत्त्वाचा वापर करावा, आवश्यक वाटल्यास अन्य रूग्णालयांशी टाय-अप करण्यात यावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. चाकण (पुणे), तारापूर (पालघर) आणि पेण (रायगड) येथे ई.एस.आय.ची ३ रूग्णालये उभारण्यास तसेच बुटीबोरी येथील रूग्णालय ३ महिन्यामध्ये उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- “आरसीबीने माझे…” ; विराट कोहलीचे भावनिक वक्तव्य
- जित पवारांच्या बैठकीनंतर पुण्यातील १६ भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
- “वहिनीसाहेब आवरा स्वतः ला, अन्यथा मानसिक…”,रुपाली पाटलांची अमृता फडणवीसांवर टीका
- बजेटबाबत चेतन भगत यांची प्रतिक्रिया; म्हणाले, निवडणुका असताना…
- “अर्थसंकल्प निराशाजनक…”; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

