Share

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आजी – माजी आमदारांचा उत्साह

Published On: 

🕒 1 min read

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आजी – माजी आमदारांसह माजी खासदार खुप मोठया प्रमाणात उत्साह दाखवत आहेत. त्यामुळे या निवडूकीत सर्वसमान्य तसेच गैर राजकारणी येणे किंवा निवडणुक लढवणे खुप कढीण आहे. आता कोणाच्या गळ्यात अध्यक्ष, उपाध्यक्षांची माळ पडते हे बघणे महत्वाचे असणार आहे.

या मध्ये जिंतुरच्या भाजपच्याआमदार मेघना बोर्डीकर, पाथरीचे काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर, भाजपचे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, राष्ट्रवादीचे वसमतचे आमदार  राजु नवघिरे, विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी,  तसेच माजी आमदारामध्ये सुरेश देशमुख, रामप्रसाद बोर्डीकर, भाऊराव पाटील गोरेगावकर तसेत माजी खासदार शिवाजी माने हे देखील यामध्ये रिंगणात उभे आहेत.  ही मंडळी अगोदरच कोणत्यान कोणत्या पक्षाचे नेते, माजी आमदार तसेच विद्यमान आमदार देखील आहेत. पण सत्तेची लालसा राजकारणापासून दुर जाणे हे त्यांना कधीच रुचत नाही.

विद्यमान आमदार सवत: निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर आजी – माजी आमदारांचे चिंरजीव, पत्नी, स्नुषा देखील या बँकेच्या राजकारामध्ये वारसदार म्हणून उतरले आहेत. यामध्ये आता कोणाचा वारसदार टिकणार ? याबाबत तर्क वितर्क देखील काढण्यात येत आहेत. तर आता राजकारण तसेच प्रचार मोहिम ५ दिवसांत संपणार आहे. तर २१ तारखेला मतदान होणार आहे. तर २२ तारखेला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कोणतेही राजकारणात प्रवेश करण्याचा सोपा मार्ग म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक म्हणुन बधितला जातो.

तर आता सध्या कोणत्याच निवडणुका नसल्याने सर्वच पक्षीय राजकारणी एका लक्षाने पछाडले जावून निवडणुक एक ध्येय समाेर ठेवून निवडणुक लढताना दिसत आहेत. या सर्व पक्षीय आजी – माजी आमदारांचे कोठे  न कोठे एकमेकांशी काम पडतेच त्यामुळे ही निवडणुक सर्वांनी प्रतिष्ठेची केली असल्याचे म्हटले तर वावगे ठरु नये. आणि राजकीय आघाड्यात तोड -फोड, फोडा – फोडी, पळवा – वळ‌वी देखील खुप मोठ्या प्रमाणात करण्यास संधी असते. त्यामुळेही निवडणुक सर्व पक्षीय आमदार – खासदारांनी प्रतिष्ठेची केल्याचे दिसते.

महत्त्वाच्या बातम्या 

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!