नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला.
नवख्या खेळाडूंना सोबत घेत रहाणेने भारताला कसोटी मालिकेत विजय मिळवून दिला. यामुळे कर्णधार रहाणेला क्रिकेटविश्वातून कौतुक करण्यात आलं. विराटऐवजी रहाणेलाच कर्णधार करा, अशी मागणी करण्यात आली. रहाणेचं भारतात परतल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आलं. दरम्यान, यावर अजिंक्य रहाणे याने स्पष्टीकरण देत या प्रकरणाला पूर्णविराम दिला होता, आम्ही (विराट कोहली) चांगले मित्र आहोत आणि विराट कोहलीच भारतीय संघाचा कर्णधार राहील असे स्पष्ट केले होते.
यांनतर आता भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या ५ फेब्रुवारी पासून ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. त्यापूर्वी पीटरसनने रहाणे आणि विराटच्या नेतृत्वाबद्दल प्रतिक्रिया दिली. यावर पीटरसन याने, स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात, अजिंक्य रहाणेनंतर पुन्हा विराट कोहलीने संघाची जबाबदारी घेणे एक रंजक गोष्टीसारखे आहे, असे वक्तव्य केले आहे.
त्याचबरोबर केविन पीटरसन पुढे म्हणाला, ‘विराट कोहली, जेम्स अँडरसन, अजिंक्य रहाणे हे या मालिकेत कसे प्रदर्शन करतात हे पाहायला मिळेल.’ त्यानंतर तो म्हणाला, ‘इंग्लंड संघात जोफ्रा आर्चर आहे आणि भारतीय संघात चेतेश्वर पुजारा. जोफ्रा आर्चर पुजाराला बाद करू शकेल का? जसप्रीत बुमराह याचेदेखील संघात आगमन झाले आहे, त्यामुळे हे पाहाणेही उत्सुकतेचे असेल.’ तर ‘भारतीय संघाला मायदेशी खेळण्याचा फायदा होईल. इंग्लंड संघाने पाहिल्या २ कसोटी सामन्यासाठी आपला सर्वश्रेष्ठ संघ निवडला नाही. जॉनी बेअरस्टो संघात असायला हवा होता. तरी भारतीय संघ विजयाचा १०० दक्के दावेदार आहे.’ असे भाष्य त्यांनी यावेळी केल आहे.
महत्वाच्या बातम्या
- एलआयसीच्या खासगीकरणामध्ये पॉलिसीधारकांना मिळणार मालक होण्याची संधी !
- माजी आ.हर्षवर्धन जाधव यांच्या मैत्रिणीचा विनयभंग, गुन्हा दाखल
- एल्गार परिषदेत गरळ ओकणारा शरजील उस्मानी नक्की आहे तरी कोण ?
- भाजपच्या मतपेढीला सुरुंग लावण्याचे शिवसेनेचे प्रयत्न सुरूच; ‘उद्धव ठाकरे आपडा’नंतर ‘रासगरबा’
- धोनीच्या शेतातील भाजी विकणारी गोंडस भाजीवाली झीवा ! पहा व्हिडीओ…


