Share

Shinde VS Thackeray : शिवसेना आमदार भास्कर जाधव ‘नॉट रिचेबल’; ‘शिंदे’सेनेच्या गटात सहभागी?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेला गळतीचे जणू ग्रहणच लागल्याचे दिसून येत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. कालपर्यंत शिवसेनेत असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) नॉट रिचेबल दाखवत आहेत. त्यांचा फोन लागत नसल्याने अनेक चर्चांना उधान येत आहे. इतर आमदारांप्रमाणे भास्कर जाधवही ‘शिंदे’ सेनेत सहभागी तर नाही झाले ना? अशा चर्चा आता रंगत आहेत.

दरम्यान सेनेशी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ४९ आमदारांचे पाठबळ आहे तर शिवसेनेकडे १५ मात्र आता भास्कर जाधवही नॉट रिचेबल असल्यामुळे ही संख्या कमी होऊ शकते. या राजकीय घडामोडींचा महाविकास आघाडीवर परिणाम होत आहे. मविआ सरकार डगमगीत होताना दिसून येत आहे.

काल (२३ जून) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले कि, “राज्याचे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आमचा खंबीर पाठिंबा आहे. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू. सरकार टिकण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. मी दुपारी मुख्यमंत्र्यांशी बोललो, आताही बोललो. यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. ही आमची अधिकृत भूमिका असेल. प्रसारमाध्यमांनी इतर कोणत्याही वृत्तावर विश्वास ठेवू नये. शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं आहे ते त्यांचे प्रवक्ते सांगतील.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!