🕒 1 min read
मुंबई : आजपासून विधानसभेच्या दोन दिवशीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्याचवेळी विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही निवडणुक नव्या नियमानुसार आवाजी पद्धतीने पार पडली. यामध्ये शिंदे फडणवीस सरकारकडून भाजपचे राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे राजन साळवी हे मैदानात होते. या लढाईत भाजपच्या राहुल नार्वेकर यांचा १६४ मतांच्या आकड्यायामुळे विजय झाला. तर दुसरीकडे शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली.
अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या शुभेच्छापर भाषणे सुरू होती. या दरम्यान धनंजय मुंडे यांच्या भाषणाच्या वेळी त्यांचा विधानसभा अध्यक्ष पदाच्या नावावरून गोंधळ उडाला. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या ऐवजी शिवसेनेच्या नेत्याचे नाव घेतलं. यानंतर इतर आमदारांनी धनंजय मुंडेंना नाव चुकीचे घेतल्याचे लक्षात आणून दिले.
विधानसभा अध्यक्षांच्या नावावरून धनंजय मुंडे गोंधळले
धनंजय मुंडे यांच्याकडून राहुल नार्वेकरांच्या ऐवजी मिंलिद नार्वेकरांचे अध्यक्ष म्हणून नाव घेताच सभागृह सदस्यांनी त्यांना थांबवले. त्यानंतर सुनील प्रभू यांनी ही चूक रेकॉर्डवरून काढण्यात आल्याची सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.
विधानसभेत शुभेच्छापर भाषणात बोलताना धनंजय मुंडे यांनी, प्रत्येक विधायकावर चर्चा व्हावी. कोणतेही विधायक चर्चेविना पारित करू नये, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. तसेच चर्चा करण्यासाठी सदस्यांना वेळ द्यावा, अशी मागणही केली आहे.
बऱ्याच महिन्यांनी आता विधानसभेला अध्यक्ष मिळाले आहेत. १६४ मतांसह भाजपचे राहुल नार्वेकर हे नवे विधानसभा अध्यक्ष बनले आहेत. राहुल नार्वेकर हे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. ते पहिल्यांदा शिवसेना या पक्षात होते. तसेच ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय ही मानले जात होते. त्यानंतर त्यांनी मतभेदांमुळे शिवसेना पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल नार्वेकर हे कुलाबा मधून आमदार म्हणून निवडून आले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
