Share

Sanjay Raut: “आता वाघ गरूड झेप घेणार, महाराष्ट्र शिवसेनेच्या कवेत येणार”; संजय राऊतांना विश्वास

Published On: 

नाशिक : दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काल ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे ठाणे महापालिकेवरील नियंत्रण पूर्णपणे संपले. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतील तब्बल ३० शिवसेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून हे ३० नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत बोलताना म्हणाले कि, महापालिकांवर आता प्रशासकाची नेमणूक झाली आहे. त्यामुळे जे गेले ते नगरसेवक नव्हते. शिवाय अशा अफवा पसरु नका असा सल्ला देऊन आता सर्व राज्य आपल्यासाठी रिकामे आहे. त्यामुळे वाघ आता गरुड झेप घेणार आणि महाराष्ट्र शिवसेनेच्या कवेत येणार, असे म्हणत शिवसेना ही पक्ष संघटनेवरच भर देणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, नवी मुंबईतील नगरसेवकांमध्ये ऐरोली विधानसभेतील २० आणि बेलापूर विधानसभेतील १० असे एकूण 30 नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. तसेच १८ पैकी जवळपास १२ खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. एकीकडे शिवसेनेत पडलेली मोठी फूट आणि भाजपने शिंदे यांना दिलेलं मुख्यमंत्रीपदामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. त्यामुळेच अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!