Share

रेल्वेत प्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता लसीच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक

Published On: 

मुंबई : राज्य सरकारनं अत्यावश्यक सेवेतील ज्या कर्मचाऱ्यांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत त्यांनाच उपनगरीय रेल्वे सेवेचा पास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना आता ओळखपत्रावर रेल्वेचा पास मिळणार नाही. राज्य शासनाकडून एका परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेवर विपरित परिणाम होऊन आतापर्यंत पास देण्यात येत होते. राज्यात लसीकरणाची प्रक्रिया गतीनं सुरु असून लसींचा साठा आणि पुरवठा देखील सुरळीत होत आहे. ज्या लोकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशा सर्वांना आपत्ती निवारण विभागाकडून मिळणाऱ्या पासच्या आधारे प्रवास करता येणार आहे.

उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी पूर्ण लसीकरणाची अट घालण्यात आली होती याचा विस्तार करून आता यात आवश्यक सेवेतील तसेच शासकीय सेवेतील लोकांना सामील करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे यापुढे प्रवासासाठी “संपूर्ण लसीकरण” झालेल्या व्यक्तींनाच सार्वत्रिक पास देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!