Share

प्रभाकर साईल अडचणीत येण्याची शक्यता; सॅम डिसुझा म्हणून केला दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो व्हायरल

Published On: 

मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासह इतर काही जणांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणावरून सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण होताना दिसत आहे. दरम्यान, मुंबई क्रुज ड्रग प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावीचा खाजगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल हा आता अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आर्यन खानच्या सुटकेसाठी मागितलेल्या 25 कोटीतील 38 लाख आपण ज्या सॅम डिसुझा नामक व्यक्तीला दिल्याचे सांगून त्याचा फोटो एका चॅनलमध्ये दाखविला होता. तो फोटो असणारी व्यक्ती ही पालघरमधील हेनिक बाफना आहे. प्रभाकर साईल यांनी आपल्या प्रोफाइल फोटो दुरुपयोग केल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे. तसेच या प्रकरणाचा आपला कुठलाही संबंध नसल्याने प्रभाकरवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पालघर पोलीस अधिक्षकाकडे केली आहे.

प्रभाकर साईल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीदरम्यान क्रुझवरील कारवाईनंतर बाहेर आल्यावर किरण गोसावीला सॅम नामक व्यक्तीचा फोन आला. ह्या संभाषणादरम्यान 25 कोटीची मागणी करून 18 कोटींची डील फिक्स करून त्यातील 8 वानखेडे यांना देऊन बाकी 10 आपण वाटून घेऊ असे संभाषण गोसावी आणि सॅम दरम्यान झाल्याचा दावा प्रभाकरने केला. याच सॅमने माझ्या मार्फत चर्चगेट जवळील एका हॉटेल जवळ 38 लाख रुपये घेतल्याची माहिती दिली.

दरम्यान, प्रभाकरने आपल्या मोबाईलमध्ये दाखवलेला सॅम नामक व्यक्तीचा फोटो हा पालघरमधील एक व्यापारी हेनिक बाफना यांचा आहे. मी प्रभाकर साईल यांना दोन महिन्यापूर्वी व्यवसायानिमित्त भेटलो होतो. मात्र, माझा त्याच्याशी कुठलाही व्यवहार झाला नाही, असा तक्रार अर्ज संबंधित व्यक्तीने पोलीस अधिक्षकाकडे दिला. माझा प्रोफाइलवरील फोटो आणि माझ्या मोबाईल नंबरचा आधार घेत माझे सॅम नाव सांगून मला 38 लाख रुपये दिल्याची माहिती प्रसारित करून प्रभाकर साईल माझी बदनामी करीत असल्याचे बाफना यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. माझी बदनामी करणाऱ्या प्रभाकर यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी या अर्जातून करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!